Breaking News

ध्यास घ्या सुरक्षिततेचा विकास होईल भारताचा


आजच्या युगात स्त्रियांनी केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. स्त्रियांनी आपल्या क्षमतेचा ठसा आज प्रत्येक क्षेत्रात उमटवलेला आपणास पाहायला मिळतोय. परंतू आज त्यांच्या प्रगतीस अडथळा निर्माण करणारी समस्या निर्माण होत आहे आणि ती म्हणजे ’महिलांची सुरक्षितता ’. परंतु आता हा विषय इतर राज्यांच्या रणधुमाळीत एक चर्चेचा विषय ठरत आहे की आजपर्यंत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना राबवल्या जातात किंवा गेल्या आहेत. आजतागायत स्त्रियांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलून ’महिला सुरक्षा पथक ’, निर्भया आणि अनेक हेल्प सारख्या मोबाईल ऍप्सची निर्मिती केली गेली जेणेकरून महिलांना सुरक्षेसाठी तात्काळ मदत मिळू शकेल. 

याचा शहरात शिक्षण घेणार्‍या, नोकरी करणार्या महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला मात्र अद्याप ही ग्रामीण भागातील युवती व महिला असुरक्षिततेची भावना बाळगून आहेत. याचा प्रत्यय वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमातील बातम्यांमधून पाहायला मिळतोय. यातून विचार येतो की, समाजात आज महिलांविषयी आदर किती प्रमाणात उरलाय? 

आज ग्रामीण भागातून अनेक शाळकरी मुली , कॉलेज युवती , नोकरदार महिला , शिक्षण आणि नोकरीसाठी खासगी तसेच सार्वजनिक वाहनातून व, रस्त्याने प्रवास करत असतात. मात्र या प्रवासादरम्यान त्यांना अनेक वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा आणि छेडछाडीसारख्या प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. ही समस्या एक दिवसाची न राहता रोजरोजची बनली असल्यामुळे याकडे दूर्लक्ष ही करता येत नाही. त्यामुळे महिलावर्गाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे स्त्रिया खरोखरच बाहेर सुरक्षित आहेत का? असा प्रश्र्न सर्वांसमोर उभा राहतो . 

भर दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेत तर महिलांसाठी असुरक्षिततेच वातावरण तयार होत आहे. या वेळेत जर महिलांनी बाहेर पडायच म्हटल तर संकटांशी सामना केल्यासारख होतय. कारण पुलाखाली, बसस्टॉपवर ,झाडाखाली, सावलीच्या ठिकाणी चार-चौघांचा नवयुवकांचा घोळका डोळ्यावर गॉगल , हातात ब्रॅण्डेड मोबाईल आणि गाडी घेवून रस्त्यात थाटात गप्पा मारत आणि टोमणेबाजी करत बसलेले असतो हे चित्र प्रत्येक ठिकाणी पहायला मिळतय. यातून पून्हा रस्त्यावरून येणार्या -जाणार्यावर टोमणा मारण, एखाद्या युवतीचा पाठलाग करून त्रास देण यांसारखे प्रकार घडत आहेत. हे एवढच नव्हे तर हा त्रास बस , अन्य सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना परत भोगायला लागतोय . या सगळ्यावर कोठे तरी नव्याने प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि गाण्यांचा परिणाम होत असल्याचे आढळते. कारण रस्त्यात थांबणारा प्रत्येक युवक , माणूस स्वतःला अभिनेता समजायला लागलाय अशी अवस्था झाली आहे. तर संध्याकाळी प्रवास करणार्‍या स्त्रियांनी मद्यपी आणि वाईट नजरेने वागणा-या विचित्र लोकांचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतीत तक्रार कोणाजवळ कळणार हा प्रश्र्न उभा राहतो ? यामुळे महिला कोठे ही स्वतंञपणे प्रवास करू शकत नाहीत . कारण ’-जिथे - तिथे हेच आणि रोज पहायच हेच अशी गत झाली आहे . त्यामुळे महिलांनी स्वतःच सक्षम , खंबीर होवून सामना करण्याची गरज भासू लागली आहे. स्वसंरक्षणाची जवाबदारी स्वतःचीच असते.
समृद्धी शेडगे