Breaking News

वडूज येथे मूकपदयात्रेस प्रतिसादवडूज / प्रतिनिधी : धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या स्मृति निमित्त वडूज येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतर्फे मुकपदयात्रा काढण्यात आली. या मुकपदयात्रेस शहरातील युवक व हिंदुत्ववादी कार्यकत्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
जोतिर्लींग मंदिरापासून या मुकपदयात्रेस प्रारंभ झाला. या पदयात्रेत शुभम ठिगळे, अलोक महाजन, रमेश गोडसे, दीपक तुपे, संकेत गोडसे, ओंकार गाडवे, आण्णा जाधव आदिंसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पदयात्रेमुळे युवकांनी शिवप्रतिमा व संभाजीराजे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली. प्रतिमेसमोर मशाल तसेच भगवा झेंडा फडकावत ग्रामप्रदक्षणा पूर्ण केली.