Breaking News

ज्ञानदीप संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


कराड / प्रतिनिधी : ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय आणि ज्ञानदीप कौशल्य विकास केंद्रात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, सचिव नेताजी थोरात, संचालक संभाजी जमाले, मधुराणी थोरात, अर्चना पाटील, प्रशिक्षिका मृणाल गरुड, वैशाली ताटे, सुवर्णा सुर्वे, किशोर थोरात आदींसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. आनंदा थोरात म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, कार्याचा आदर्श घेवून प्रत्येकांनी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.