Breaking News

कडेगांव पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकात्मतेची गुढीकडेगांव / प्रतिनिधी - येथील पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय एकात्मतेची गुढी हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वधर्म समभाव या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन हसबनिस यांच्या पुढाकाराने व महिलाच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

यावेळी जेष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, माजी सैनिक शिवाजीराव देशमुख, साहेबपीर पिरजादे, उपनगराध्यक्ष साजिद पाटील, शिराज पटेल, माणिकराव देशमुख, विजय गायकवाडं, मानसिंगराव देशमुख, नसिर पटेल, रियाज इनामदार आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात जवळपास सर्वांनीच एकात्मकतेचा संदेश दिला. महिला पोलिस कर्मचारी, पोलीस पाटील व युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.