Breaking News

श्री रामाचे चरित्र मानवी जीवनाला मार्गदर्शक-माळवदे


शहरटाकळी/प्रतिनिधी : श्रीरामाची निष्ठा मर्यादा पुरुषोत्तमाच्या रूपात असून मर्यादेचे पालन करण्यासाठी प्रभू रामाने राज्य मित्र माता-पिता या सर्वांची साथ सोडली. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या आदर्श पत्नी सिताने श्रीरामा बरोबर 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. श्री रामाचे चरित्र आजच्या मानवी जीवनाला मार्गदर्शक असल्याचे मत हभप रामायणाचार्य वैभव महाराज माळवदे यांनी व्यक्त केले. 

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे श्री रामनवमीनिमित्त आयोजित किर्तन सवे प्रसंगी हभप वैभव महाराज बोलत होते.यावेळी बोलताना वैभव महाराज माळवदे पुढे म्हणाले की, श्री प्रभू रामचंद्राचे अनेक रूपे आपल्याला पहायला मिळत असून प्रभू श्रीरामाच्या चरित्रातून आई-वडील गुरुजनांची आज्ञापालन करणे, भावाबरोबर सच्चे प्रेम करणे, मानवी जीवन जगताना पुरुषोत्तम श्रीरामाच्या आदर्श विचारांची गरज असल्याचे सांगितले. किर्तन प्रसंगी भाजपा मा.जिल्हा सरचिटणीस वाय.डी.कोल्हे, सरपंच अलकाबाई शिंदे, हभप मोहन खंडागळे, हभप शिवाजी नाना मडके, हभप गोविंद कावळे, हभप दिलीप राजळे, हभप एकनाथ क्षीरसागर, हभप राजेंद्र दळवी, हभप मनोहर गवळी, हभप साहेबराव गवळी, हभप प्रल्हाद हत्ते, महालिंग आप्पा वैद्य, रामाप्पा गिरम, सह भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.