Breaking News

सावित्रीबाई फुलेंच्या कार्यामुळेच स्त्री शक्तीस सन्मान - डॉ. बेग
राहुरी/प्रतिनिधी


महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पेरणेने सावित्रीबाई फुलेंनी समस्त महिला वर्गासाठी केलेले कार्य गौरवास्पद आहे. सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या श्रमांना सुमधुर फळे लागली आहेत. त्यांच्या प्रयत्नानेच आज स्त्री शक्तीलासन्मान प्राप्त झाल्याचे प्रतिपादन सुप्रसिध्द हास्य कवी डॉ. मिर्झा बेग यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश तुरबठमत, कुलसचिव सोपानराव कासार, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, विद्यार्थी परिषदउपाध्यक्ष डॉ. राजु नाईक, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान, आदी उपस्थित होते.

डॉ. मिर्झा बेग यांनी आपल्या भाषणात सध्या आपल्या समाज मनावर असलेले इंग्रजी भाषेचे वर्चस्व व त्यामधून मराठी भाषेचे होणारे नुकसान या विषयी अत्यंत मार्मिक शब्दात आपल्या विनोदी शैलीत भाष्यकेले. विनोदाबरोबरच त्यांनी केलेल प्रबोधनाने विद्यार्थी प्रभावित झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश तुरबतमठ यांनी केले. या प्रसंगी पदव्युत्तर महाविद्यालयाचे कृषिगंध या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीएम.एस.सी. अॅग्रीची कु. ॠतुजा शिंदे आणि पी.एच.डी. चा विद्यार्थी श्री. पद्मकुमार पाटील यांना सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी म्हणून प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सन 2018-19 मध्ये पारपडलेल्या विविध क्रिडा स्पर्धेच्या विजेतांचे प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थितहोते.