Breaking News

कारमध्ये सापडले २० लाख रुपये


पारनेर/प्रतिनिधी: नगर कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथे निवडणूक पथकाने केलेल्या कारवाईमध्ये कार मधून २० लाख ४५ हजार ९०० रूपये जप्त केले आहेत. सापडलेली रक्कम अहमदनगर येथे कोषागार कार्यालयात जमा केली आहे. परंतु सबंधीत रकमेशी उमेदवारांचा सबंध नसून मुंबई येथील बांधकाम व्यावसायीकाची ही रक्कम आहे. चार दिवसांत या रकमेची माहीती देण्याचे त्यास अनिवार्य केले आहे.

रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास निवडणूक पथकाने कार या वाहनामधून (क्र.एम.एच.०५ ई.एन.८८९९) सदर रक्कम हस्तगत केली. गाडीचालक मंगेश दशरथ गायकर रा.कल्याण हा अहमदनगरकडे जात असताना या वाहनाची झडती घेण्यात आली. झडती नंतर यामध्ये हि रक्कम सापडली. कारवाई करणाऱ्या या पथकामध्ये नंदेश कर्डीले,भास्कर झावरे,पो.काँ.सुरज कदम,पो.काँ.निवृत्ती साळवे,सरकारी वाहन चालक उज्वल निकाळजे आदींचा समावेश होता.

सदर कारवाईमधील पैसे ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. नगर आयकर विभागाला माहिती देऊन आयकर विभागाच्या मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. आयकर विभागाला त्यामध्ये संबधीत व्यक्ती दोषी आढळल्यास आचारसंहिता कक्षामार्फत त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात येईल.

- विशाल तनपुरे (आचारसंहिता कक्ष प्रमुख, पारनेर)