Breaking News

राजे शिवाजी पतसंस्थेस दोन कोटींचा नफाकान्हूरपठार /प्रतिनिधी
 अहमदनगर , पुणेनाशिकठाणेऔरंगाबाद जिल्ह्यातील अग्रेसर असलेल्या कान्हूरपठार  येथील राजे शिवाजी पतसंस्थेस दोन कोटी आठरा लाख रूपयांचा विक्रमी नफा मिळाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्षआझाद ठुबे यांनी दिलीया वेळी उपाध्यक्ष शमशुद्दीन इनामदारसंचालक उदयकुमार सोनावळेनंदकुमार ठुबेविजय काकडेसंतोष ठुबेभाऊसाहेब नवलेडॉकिरण लोंढेकिशोर शिंदेसंतोष कोठारीसाहेबराव जेजुरकरसारिका भास्कर पोपळघटज्योती तुषार ठुबेसंस्थेचे मॅनेजर जी.के ठुबे उपस्थित होते.

 याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष ऍड .  ठुबे यांनी सांगितले की दुष्काळी परिस्थितीतही संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी  केलेले प्रयत्न  कर्जदार सभासंदांनी वसुलीसाठी दिलेला प्रतिसाद यामुळेच संस्थेला हे यश संपादनकरण्यात यश आलेग्रामीण भागातील तरुणशेतकरी , शेतमजूरमहिला ,  व्यापारी यांची पत उंचवण्यासाठी संस्थेने ९० कोटी ३५ लाख ४७ हजार ८३९ रूपयांचे कर्ज वाटप केले आहे . ठेवीदारांचे  हित डोळ्यासमोर ठेऊनविवीध ठिकाणी ५२ कोटी ९२ लाख ७३ हजार १६४ रूपयांची गुंतवणूक केली आहे.