Breaking News

गटेवाडीत हनुमान आजी माजी सैनिक संघटनेची स्थापना


पारनेर/प्रतिनिधी: पारनेर तालुक्यात गटेवाडी येथील आजी माजी सैनिकांनी समाज हित लक्षात घेत एकञ येऊन श्री हनुमान आजी माजी सैनिक संस्था सघंटनेची स्थापना केली आहे.

याप्रसंगी निवृत्त कर्नल साहेबराव शेळके, कॅप्टन प्रभाकर थेऊरकर, माजी सैनिक सहदेव घनवट, शिवाजी पालवे, अंबादास तरटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना घनवट म्हणाले की, माजी सैनिकांनी समाज हिताच्या भावनेतून एकञ येत उभारलेली संस्था ही भविष्यात गटेवाडी गावासाठी व समाजासाठी उपयुक्त ठरेल, तसेच पारनेर तालुक्यात प्रत्येक गावात आजी माजी सैनिक संघटनाचे जाळे उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व आजी माजी सैनिकांना बरोबर घेवुन, निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करू व थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचा आर्दश घेवून राहिलेले जिवन समाजसेवे साठी अर्पन करणार अरसल्याचे असे सांगितले.

जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे म्हणाले की, देशाचे रक्षण करून सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या पेशंन मधून दरमहा काही रक्कम जमा करून गटेवाडी गावचा कायापालट करण्यासाठी सर्वोतपरी मदत करणार आहोत. तसेच प्रमाणिकपणे कार्य करून गटेवाडी आदर्श गाव होईल, या गावा साठी आम्ही सर्व संघटनेच्यावतिने प्रयत्न करणार आहोत. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पारनेर व नगर तालुक्यातील आजी माजी सैनिक, घनवट सहदेव, बोरूडे संपत, सुंबे अंशाबापु, रामा औटि, अनिल वैदय, नितिन दावभट, बाळु जाधव, वाबळे गुलाब, संजय पठारे, मारुती खेडेकर, शिवाजी पालवे जगन्नाथ जावळे, दिगंबर शेळके, शिंदे ज्ञानदेव, जगताप रमेश, पळवे वरुन अंबादास तरटे, शांताराम तरटे, सोपान पवार व आदी उपस्थित होते.