Breaking News

विश्र्वजित व विशाल यांच्या मैत्रीची चैत्रपालवी बहरणार काय?


कडेगांव / सदानंद माळी : चैत्राच्या रखरखत्या उन्हातचं चैत्र पालवीला बहर येवून नवचैतन्य निर्माण होत आहे. यातच सांगली लोकसभेच्या निवडणुका लागल्याने चैत्रच्या रखरखत्या उन्हाबरोबरच मैत्रीच्या मनोमिलनाचे वातावरणालाही बहर येऊ लागला आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात उतरल्यावर विशाल पाटील यांनी डॉ. विश्र्वजीत कदम याची कडेगांवला जावून भेट घेतली. त्याच्याबरोबर सुसंवाद साधत मैत्रीपुर्ण मनोमिलनाची साद घातली डॉ. कदम यांनी यास हिरवा सिग्नल देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिला असून तुमची उमेदवारी ही माझीच उमेदवारी आहे असे सांगितले. तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाही तसा आदेश असणार आहे. कारण विशाल पाटील हेच खासदार करणारच असा दृढनिश्र्चय केला असून त्यात कोणताही बदल होणार नाही. प्रतिकदादा आमचे मोठे भाऊ असून विशाल आणि मी दोघेही लहान भाऊ आहोत. आमच्यातील समन्वयकाची भूमिका आता प्रतिकदादा तुम्ही घेणे गरजेचे आहे. विशाल पाटील आपला प्रतिक्षा काळ आता संपला आहे. आमच्याकडे आत व बाहेर असे काही अजिबात नसते, पलूस -कडेगांवाची जनता गेली चाळीस वर्ष डॉ. पतंगराव कदम यांच्या पाठीशी ठामपणे ऊभी होती. यावेळची लोकसभेची निवडणूक जिल्हाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. पलूस कडेगांव व जिल्ह्यातूनही विशालदादाना ऊच्चांकी मतदान मिळवून देवू. खरोखरच तुझ्या गळा माझ्या गळा गुंफु विजयाच्या माळा म्हणतच विश्र्वजीत कदम व विशाल पाटील याच्यामधील लोकसभेच्या विश्र्वरुपी रणकंदनावरची विशाल याची जीत होवून मैत्रीची चैत्रपालवी बहरणार काय? ह़े निवडणूक निकालानंतर समजेल हे मात्र नक्की.