Breaking News

आचारसंहितेच्या पालनासाठी विविध उपाययोजना - पाटील


राहुरी/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा  सुव्यवस्थेचे पालन होऊन शांतता प्रस्थापित राखणे गरजेचे आहेनिवडणुकीमध्ये शांततेच्या मार्गाने आचार संहितेचे पालन करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय योजनासुरू केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी दिलीराहुरी येथील तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी तहसीलदार फसेउद्दीन शेखनायब तहसीलदार गणेशतळेकरनिवडणूक  शाखा अधिकारी चंद्रकांत दुर्गे  आदी उपस्थित होते.

 दक्षिण लोकसभा मतदार संघात राहुरी तालुक्यातील ६४ गावे असून मतदारांची संख्या  लाख ६७ हजार ९७१ इतकी आहेया भागातील मतदानासाठी १८० केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहेनगर तालुक्याच्या ३०गावांची मतदार संख्या ६४ हजार ११० तर पाथर्डीच्या ३६ गावात ५२ हजार ३१२ मतदार आहेतपाथर्डीसाठी ५९ तर नगर साठी ६९ मतदान केंद्र आहेतया तीन तालुक्यातील मतदान केंद्रावर  हजार ६९५ कर्मचा-यांचीनेमणूक करण्यात आली आहेनिवडणूक आयोगाच्या सुचने नुसार आचार संहितेचे पालन सुरू करण्यात आले आहेसार्वजनीक मालमत्ता तसेच शासकीय ठिकाणी असलेले  हजार ७०० बोर्ड४५१ झेंडे,६९ बॅनर्स काढुन टाकलेतसेच १६९ कोनशिला२६ जाहिराती झाकण्याचे काम करण्यात आले आहे.
         आचार संहितेचे पालन करण्यासाठी भरारी पथकवाहने तपासणी पथकव्हीडीओ चिञीकरणवाहने तसेच साहित्य वापरनिवडणुकीत होणारा खर्च यावर देखरेख ठेवण्यासाठी चार भरारी पथके तैनात करण्यात आलीआहेउमेदवाराची सोशल मिडीयावर केला जाणार प्रचारस्लाईड शोछपाई ही माहिती निवडणुक विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहेअशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.