Breaking News

हेलिकॉप्टर घोटाळ्यात बड्या व्यक्तीचे नाव; ‘ईडी’चा गौप्यस्फोट; आरोपपत्रात थेट नाव घेण्याचे टाळलेनवीदिल्लीः ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात ख्रिश्‍चन मिश्‍चेलने काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे नाव घेतले असून त्याला लाच दिल्याचे म्हटलं आहे. काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आरजी (राहुल गांधी) यांना पन्नास कोटी रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला असला, तरी आरोपपत्रांत मात्र राहुल गांधी यांचे थेट नाव घेण्याचे टाळले आहे. 

चौकशीदरम्यान मिश्‍चेलने एपी म्हणजे अहमद पटेल आणि एफएएम म्हणजेच फॅमिली अशी माहिती दिली आहे. आरोपपत्रांत मिश्‍चेलच्या पत्राचा हवाला देत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी दबाव टाकल्याचे म्हटले आहे. तसेच राजकीय व्यक्ती आणि वायुदलातील अधिकार्‍यांना लाच म्हणून 30 मिलियन डॉलर दिल्याचा उल्लेख केला आहे. यापूर्वी देखील ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 2004 ते 2016 या काळात आरजी नामक व्यक्तीला 50 कोटी रुपयांची लाच दिल्याचे म्हटले आहे. पण आरजी म्हणजे कोण? हे सांगण्यास मात्र ख्रिश्‍चन मिश्‍चेलने नकार दिला आहे.

व्हीव्हीआयपी लोकांसाठी करण्यात येणार्‍या हेलिकॉप्टर खरेदीमध्ये हा घोटाळा झाला आहे. त्याप्रकरणामध्ये आता ख्रिश्‍चन मिश्‍चेलची चौकशी सुरू आहे. संयुक्त अरब अमिरातीतन त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. 53 कोटी डॉलरचे कंत्राट मिळण्यासाठी कंपनीने भारतीय अधिकार्‍यांना 100-125 कोटी रुपयांची लाच दिली होती. या सार्‍या प्रकरणाची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. 2010मध्ये 3 हजार 600 कोटी रुपयांचा हा करार करण्यात आला होता; पण 2014मध्ये भारत सरकारने हा करार रद्द केला होता. करार रद्द झाल्यानंतर 360 कोटी रुपये लाच दिल्याचा आरोपाखाली सध्या मिश्‍चेलची चौकशी सुरू आहे. मिश्‍चेलने केलेल्या या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अजून वाढले आहे.
मिशेल याने लाचखोरीचा हिशेब असलेल्या ‘डायरी’त नोंद केलेल्या संक्षिप्त नावांचा गौप्यस्फोट केला आहे. त्यासंबंधीची माहिती अंमलबजावणी संचलनालयाने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात देण्यात आली आहे. या पुरवणी आरोपपत्रात आणखी तीन नावांचा समावेश केला आहे. त्यात मिशेलचा बिझनेस पार्टनर डेव्हिड सिम्स आणि त्यांचा मालकी हक्क असलेल्या दोन कंपन्या आहेत.