Breaking News

भाजपची टोपी घालण्यास नकार देणार्‍या विद्यार्थिनीचा छळलखनऊ - एका मुस्लिम विद्यार्थिनीने भाजपची टोपी घालण्यास नकार दिल्याने तिचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थिनीचा मानसिक आणि शारीरिक छळ करणारे तिच्याच महाविद्यालयातील दोन विद्यार्थी असून त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं आहे.

या विद्यार्थिनीनेच ट्वीट करून ही माहिती दिली. सहलीवर गेलेल्या या एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मद्यपान करून तिला भाजपची टोपी घालण्याची सक्ती केली. प्राध्यापक सोबत असताना हा प्रकार घडला.