Breaking News

मिरजगावमध्ये डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त प्रभातफेरी


मिरजगाव/प्रतिनिधी : मिरजगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या मिरजगाव नगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
 
ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. त्याच ठिकणच्या बौध्द विहारापासून महामानव विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्याची आकर्षक सजावट केलेल्या रथातून प्रभात फेरीस सुरुवात केली. ही मिरवणूक मुख्य बाजार पेठेतून जात असताना सर्व बौध्दमय वातावरण झाले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या नावाने दिलेल्या घोषणांनी मिरजगावमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गावचे उपसरपंच अमृत लिंगडे, डॉ. पंढरीनाथ गोरे, ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे, कर्जत पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुध्दीवंत, माजी सरपंच सारंग घोडेस्वार, विजय पवार, शिवाजी नवले, अविनाश घोडके उपस्थित होते.