Breaking News

महामार्ग जिल्ह्यात टोलमुक्त का झाला नाही? नरेंद्र पाटील यांचा विद्यमान खासदारांना सवाल - वाई तालुक्यातील प्रचार दौराकराड / प्रतिनिधी : चंद्रकांत दादा हे जर कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेसाठी सर्व टोलनाके माफ करत असतील तर सातारा जिल्ह्यातील विद्यमान खासदारांना प्रमुख दोन टोल नाके हे सातारकरांसाठी का नाही माफ करता आली. टोल फ्री का नाही झाला, याचे उत्तर विद्यमान खासदारांनी द्यावे असे नरेंद्र पाटील यांनी पाचवड येथे सांगितले.

शिवसेना, भाजपा, आर पी आय व मित्रपक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ना. नरेंद्र पाटील यांनी वाई तालुक्यातील 28 गावांच्या प्रचार दौरा झाला. यावेळी ते बोलत होते. नरेंद्र पाटील म्हणाले, विधानसभेत आमदार असताना मी वाई तालुक्यासाठी अनेकदा निधी दिला आहे. नरेंद्र मोदींनी शेतकर्‍यांसाठी राबवलेल्या किसना योजनेतून प्रत्येक शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होत आहेत. मोंदीनी 50 वर्षाचा बॅकलॉक पाच वर्षात भरून काढला आहे. मात्र या गावाच्या विकासासाठी विद्यमान खासदार कमी पडले आहेत. खासदारकीच्या माध्यमातून येणार्‍या निधीचा का नाही योग्य वापर केला, सातारा जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळे का नाही सुधारली. पाचगणी, महाबळेश्र्वर व कास पठार सारख्या अनेक ठिकाणांचा का नाही विकास झाला. छत्रपती म्हणून मानसन्मान हा आहेत आणि ठेवलाच पाहिजे.

परंतु एक लोकनेते म्हणून काहीच कामे का केली नाहीत, म्हणून आता बदलावाची गरज असल्याचे सांगितले.तसेच उडतरे, आसले गावामध्ये नरेंद्र पाटील यांच्या गाटीभेटीच्या कार्यक्रमात उडतारे गावातील गावकर्‍यांनी नरेंद्र पाटील यांना आमच्या गावामध्ये सेना भाजपा च्या महायुतीच्या माध्यमातून खूप विकास झाला असल्याचे सांगितले. पालकमंत्री विजय शिवतारे, चंद्रकांतदादा यांच्यासारखे अनेक नेत्यांचे लक्ष सातारा जिल्हाच्या विकासाकडे आहे. त्यांनी अनेक विकासाची कामे केली आहेत, इथून पुढेही अजून मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्याचा विकास करतील. आता पाच वर्ष तुम्ही मला द्या पुढच्या वेळेला मला मदत मागण्याची वेळ देणार नाही, असे ते म्हणाले.

विद्यमान खासदार हे जर कधी कुठे जात नसतील, कोणाला जास्त भेटत नसतील तर चौकाचौकात बॅनर लावले पाहिजेत की आपण यांना पहिले का ?