Breaking News

महिला आर्थिक दृष्टया सक्षम झाल्यातर समाजाची प्रगती- उषा पाटीलपारनेर/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्टया सक्षम झाल्या तर कुटूंबाची, समाजाची प्रगती होऊ शकते, असे मत शेतकरी कुटूंबातील यशस्वी महिला उद्योजक तसेच प्रेरणादायी व्याख्यात्या उषा पाटील यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुका जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने शहरातील सेनापती बापट स्मारकात विक्री कौशल्य व प्रशिक्षण शिबीराचे मोफत आयोजन केले होते, या शिबीरात पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी उमाताई बोरूडे, तालुकाध्यक्षा रोहिणी वाघमारे, मनिषा जगदाळे, संगिता गाडेकर, पल्लवी बांदल, मंगल काळे, कविता मगर, मनिषा मगर, अलमास राजे, अनुपमा कोल्हे सोनाली औटी, अर्चना औटी, योगीता गट यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.

यावेळी पाटील म्हणाल्या की, अनेक कुटूंब एकत्र आल्यानंतर समाज तयार होतो. या समाजात सन्मानाने जगायचे असेल तर महिलांचे आर्थिक सक्षमिकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. महिलांचा आर्थिक स्तर उंचवायचा असेल तर व्यवसायाचे सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. यश अपयश हे आपल्या व्यवसायाच्या नियोजनावरच अवलंबून असते. यासाठी महिलांना ज्या विषयात आपली आवड असेल त्याचे संपूर्ण ज्ञान अवगत करण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. वाचनामुळे स्वतःचा आत्मविश्‍वास वाढून प्रश्‍नांच्या आकलन शक्तीमध्ये वृद्धी होते. यशस्वी उद्योजकांचे योग्य मार्गदर्शन हे देखील स्वतःस व्यवसायिक बनविण्याचे गमक आहे. यशस्वी उद्योजकाने व्यवसाय निवडणून मिळविलेल्या यशमागे त्याने केलेला त्याग असतो. त्यांनी एक ध्येय निश्‍चित केलेले असते. त्यामुळे ते यशाच्या शिखरापर्यंत पोहचतात. जगामध्ये महामानवांनी केलेल्या नियोजनाचाही आदर्श घेणे उपयुक्त ठरते.