Breaking News

हिरडगाव फाट्या जवळ अपघात


श्रीगोंदे/प्रतिनिधी : श्रीगोंदे कर्जत रस्त्यावरील हिरडगाव फाट्यानजीक डी.वाय.चारी नं.14 जवळ महिंद्रा पिक-अप व मोटरसायकल यांच्यात समोरा-समोर धडक होऊन 1 जण ठार तर 2 जण जखमी झाले. शनिवार दि.13 रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास तिघेजण श्रीगोंदे येथून दुरगाव ता.कर्जत येथे दुचाकी क्र.एम.एच.16.ए.के.6650 वरून जात असताना हिरडगाव फाट्यानजीक डी.वाय.चारी नं.14 जवळ कर्जत कडून श्रीगोंद्याकडे येणार्‍या महिंद्रा पिक-अप क्र.एम.एच.16.ए.वाय.3902 या गाडीने भरधाव वेगाने येत दुचाकीला समोरासमोर धडक दिली. 

यात तय्यब रहीम शेख (वय 21) रा.बेलवंडी कोठार हा तरुण जागीच ठार झाला. तर नवनाथ बाबुराव कोथींबीरे व अयुब सय्यद हे जखमी झाले. धडक झाल्यानंतर जखमींना परिसरातील नागरिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदे येथे उपचरासाठी दाखल केले. या घटनेबाबत अमीर सय्यद याच्या फिर्यादी वरून महिंद्रा पिक-अप चालकाविरुध्ह गुन्हा दाखल करून पुढील तपास पो. निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.बी.झुंझार हे करत आहेत.