Breaking News

मसूरच्या दोघांवर मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल

Image result for मारहाण

प्रतिनिधी / उंब्रज : मसूर (ता.कराड) येथील मामाच्या मिरची मसाला दुकानात बसलेल्या युवकाकाकडे 10 हजाराची मागणी करून त्यास स्टिलची पाईप व कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन युवकांवर मारहाण व खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

रणजीत नथुराम सरगर (वय.20 रा.वाघेश्वर) व अक्षय उर्फ आप्पा अंकुश लोखंडे (वय.22 रा.संजयनगर मसूर ता.कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहेत.

याबाबत सुहेल अश्पाक शेख (रा.मसूर ता.कराड, मूळ रा. कोपर्डे काशीळ, ता.जि.सातारा) याने फिर्याद दिली आहे. 13 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा त्यांच्या मामाच्या मसूर येथील मिरची मसाल्याच्या दुकानात बसला होता.

त्यावेळी रणजित सरगर हा हातात पाईप घेऊन व अक्षय लोखंडे हा दुचाकीवरून दुकानात आले. यावेळी दोघांनी फिर्यादीस दहा हजार रूपयांची मागणी केली.

त्यानंतर दुकानातील सामानांनी भरलेल्या भरण्यांची नासधूस करून फिर्यादीचा मोबाईल फोडला. त्यांच्या डोक्यात घाव घालून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत संशयित युवकांना पोलिसांनी अटक करून कराड न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश अपसमज करीत आहेत.