Breaking News

कांदा अनुदान प्रस्ताव स्विकारण्यासाठी मुदतवाढ


संगमनेर/प्रतिनिधी।
कृषि उत्पन्न बाजार समितीसंगमनेर मध्ये दिनांक  नोंव्हेबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये  जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणेअनुदान मंजुर करण्यात आलेले असून सदर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०१९ पात्र कांदा अनुदान प्रस्ताव स्विकारणेस सांगितलेले होते.

परतुं शासनाच्या दिनांक  एप्रिल २०१९ च्या आदेशानुसार कांदाअनुदान प्रस्ताव स्विकारणेस वाढीव मंजुरी देवुन ती १५ एप्रिल २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहेत्यामुळे जे कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानाचा लाभ घेण्यापासुन वंचित राहिले आहेत्यांनी आपला कांदा अनुदानप्रस्ताव विहित नमुन्यात भरुन दिनांक १५ एप्रिल १९ रोजी साडे पाच वाजेपर्यंत या बाजार समितीच्या कार्यालयात जमा करावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती मा.शंकरराव खेमनरउपसभापती सतिष कानवडे सचिव सतिष गुंजाळ यांनी केले आहे.