Breaking News

देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थनीतीची गरज : दिलीपकुमार सानंदा

 
खामगाव,(प्रतिनिधी): भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी सामाजिक न्याय आणि राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापीत करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अर्थनिती आवश्यक आहे. अमेरिकेतील विख्यात कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या डी.एससी (डॉक्टर ऑफ सायन्स)अशा दोन पदव्या घेणारे भारतातील एकमेव अर्थशास्त्रज्ञ होते. 

आजही देशात 20 टक्के जनता दारिद्ररेषेखाली आहे. तर एक टक्के लोकांच्या हातात देशातील 54 टक्के उत्पन्न तर 73 टक्के संपत्ती एकवटली आहे. बेरोजगारी वेगाने वाढत आहे,शेतकरी मोठया प्रमाणात आत्महत्या करीत आहे. म्हणुन आज देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थनितीकडे वळविण्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले. भारतीय बौध्द महासभेच्या वतीने 14 एप्रिल रोजी ज्ञानसम्राट, प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे शहरअध्यक्ष दादाराव हेलोडे हे होते. 

प्रमुख उपस्थितीमध्ये जेष्ठनेते शरदभाऊ वसतकार, भिमराव तायडे, जेष्ठ नेते व्ही.पी.दांडगे, गणेशभाऊ चैकसे, कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, काँग्रेस शहर अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण कदम, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने अंबादास वानखडे, व्ही.एम.भोजने, महिला आघाडीच्या सौ.अनिताताई डोंगरे, भारतीय बौध्द महासभेच्या जिल्हा सचिव सौ.विशाखाताई सावंग, नगरसेवक विजय वानखडे, बी.के.हीवराळे, रमेश गवारगुरु, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मुळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना सानंदा म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्रपुर्व काळात मुकनायक, बहिष्कृत भारत आणि जनता वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकचळवळ उभी करुन जातीय व्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मुलनाचे महान कार्य त्यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दिव्य तत्वांचा साक्षात्कार असून समता, स्वातंत्र व बंधुता या शाश्‍वता मानवी मूल्यांवर नवभारताच्या उभारणीसाठी ते आयुष्यभर झटले. म्हणून समाज बांधवांनी संघटीत होउन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची तत्वज्ञान आत्मसात करावे असे आवाहन राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले व उपस्थित समाज बांधवांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. 

 याप्रसंगी जेष्ठनेते शरदभाऊ वसतकार, महिला आघाडीच्या सौ.अनिताताई डोंगरे, भारतीय बौध्द महासभेच्या जिल्हा सचिव विशाखाताई सावंग, अंबादास वानखडे, माजी जिल्हाध्यक्ष विश्‍वनाथ दांडगे, प्रा.वसंत डोंगरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व समाजाने एकजुट होउन संघटीत होण्याचे आवाहन करुन उपस्थितांना भिजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक विजय वानखडे यांनी पाठपुरावा करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाचे सौंदर्यीकरण केल्याबदद्ल समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर पंचशील ध्वजरोहण व त्रिशरणाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सानंदा परिवाराच्या वतीने लाडुचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला काँगे्रेसचे जेष्ठ नेते विश्‍वपालसिंह जाधव, जसवंतसिंग शिख, संजय तायडे, तुषार चंदेल, नकुल इंगळे, अजय इंगळे, विश्‍वनाथ हिवराळे, जी.यु.गवई, अशोक वानखडे, गजानन दामोदर यांच्यासह भारतीय बौध्द महासभेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला भगिणींची मोठया संख्येने उपस्थिती होती.