Breaking News

लिंपणगावमध्ये बंधाऱ्यात सोडले जाते दूध डेअरीचे दूषित पाणी; जनावरांचे आरोग्य धोक्यात ; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ग्रामस्थ करणार तक्रार श्रीगोंदे/प्रतिनिधी
  तालुक्यातील लिंपणगाव येथील एका खाजगी दूध डेअरीचे दूषित पाणी गावच्या बंधाऱ्यात सोडल्याने  त्यातील  पाणी दूषित झाले आहेत्याचप्रमाणे तेथे चरावयास येणाऱ्या जनावरांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झालाआहेशेजारील कूपनलिका ,विहिरी यातील पाणी देखील दूषित झाले आहेया गोष्टीकडे वारंवार लक्ष वेधूनही यावर डेअरी मालकाकडून कार्यवाही केली जात नाहीयावर ग्रामस्थांनी आक्रमक होत  प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेतक्रार करण्यासोबतच  आंदोलनाचा इशारा दिला आहे.

     लिंपणगाव येथे मागील  दहा वर्षापासून  शिरूर तालुक्यातील व्यक्तीने लिंपणगाव च्या धनगर वस्तीनजीक  एक दुधाचा चिलिंग प्लांट  उभा केला आहेपरंतु या चिलिंग प्लांटचे दूषित पाणी गावच्या बंधाऱ्याच्याप्रवाहामध्ये सोडल्याने तेथे दूषितपण आला आहेया ठिकाणी शेतकरी आपली जनावरे चारण्यासाठी आणतातपरंतु या पाण्यामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

  गावातील  सार्वजनिक विहीर   कूपनलिकेच्या पाण्याचा वापर काही ग्रामस्थ करतातपरंतु  या बंधाऱ्यामध्ये  दूषित सोडलेले पाणी कूपनलिका विहिरी नाही  हानिकारक ठरून  गावाला सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्याविहिरींचे देखील  पाणी दूषित होऊ शकते.

  संबंधित डेअरी चालकांना ग्रामपंचायत प्रशासनाने  गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी सूचना देऊनही डेअरी चालक गावातील काही मर्जीतील कार्यकर्त्यांना हाताशी धरून सदरचे दूषित पाणी बंधाऱ्याच्याप्रवाहामध्ये सोडण्याचा प्रकार दररोज चालू आहेयासंदर्भात शिवसेनेचे नेते महादेव ओहोळ यांच्यासह गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला गेल्यावर्षी धारेवर धरून गावचे वतीने निवेदन देण्यात आलेहोतेग्रामपंचायत प्रशासनाने निवेदन प्राप्त होताच तात्काळ डेअरी चालकाला नोटीस बजावून आठ दिवसांमध्ये दूषित पाण्याची विल्हेवाट लावा अन्यथा पुढील कारवाई केली जाईल अशा पद्धतीने नोटीसही गेल्यावर्षीसंबंधितांना बजावण्यात आली होती.                                  
 परंतु सदर डेअरी चालक गावातील काही ठराविक लोकांना हाताशी धरून पुढील कारवाई होऊ नये म्हणून काहींना ' खुश ' करण्याचा प्रयत्न या डेअरी चालकाने अवलंबला आहेवास्तविक पाहता या डेअरी चे क्षेत्रफळ मोठ्याप्रमाणात आहेत्यानुसार पन्नास हजाराच्या पुढे कर आकारणी करावयास हवीपरंतु ग्रामपंचायत प्रशासनालाही या डेअरी चालकाने दिशाभूल करून कमी क्षेत्र दाखवला आहेअसा आरोप नागरिकांकडून होत आहेत्यामुळेया दूषित पाण्याची विल्हेवाट लावावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


गावच्या बंधाऱ्यामध्ये दूषित पाणी सोडत असेल आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होत असेल तर ग्रामपंचायत प्रशासन अशा व्यक्तीला पाठीशी घालणार नाहीचौकशीअंती कारवाई करण्यात येईल.
लक्ष्मण मुरकुटेग्राम विकास अधिकारी.


सार्वजनिक पाणीपुरवठा धोक्यात 
 बंधाऱ्याखालोखाल गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहीर  कूपनलिका आहे . परंतु या दूषित पाण्यामुळे यातील पाणीही दूषित होण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत