Breaking News

सभासदांच्या सहकार्यामुळेच अजिंक्यतारा कारखाना प्रगतीपथावर


सातारा / प्रतिनिधी : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडून राबविण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजनांचा लाभ सभासद शेतकर्‍यांना होत आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकर्‍यांना कारखान्याचा केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमान नेहमी उंचावत ठेवण्यासाठी कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील असून शेतकर्‍यांच्या हिताचेच निर्णय घेतले जात आहेत. 

संचालक मंडळाच्या दूरदृष्टीमुळे आणि सभासद शेतकर्‍यांच्या सहकार्यामुळे अजिंक्यतारा कारखाना प्रगतीपथावर आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज उल्लेखनीय व आदर्शवत आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

कारखान्याच्या 2018-19 या 35 व्या गळीत हंगामाचा सांगता समारभ कारखाना कार्यस्थळावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चेअरमन सर्जेराव दिनकरराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि संचालक विनायक भरत बर्गे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मिता विनायक बर्गे या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण पुजा आणि हंगामातील शेवटच्या 5 साखर पोत्यांचे पूजन करुन करण्यात आला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. 

कारखान्याचे संचालक मंडळाने नेहमी कारखान्याचा विकास साध्य करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन सभासदांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सातत्याने सभासदाभिमुख कारभार करून अत्यंत काटकसरीचे धोरण अवलंबविले. त्यामुळे कारखान्याकडील साखर उत्पादनाबरोबर डिस्टीलरी, इथेनॉल व को.जनरेशन हे मूल्यवर्धीत प्रकल्प यशस्वीपणे राबविले जात आहेत. 

कारखान्याचा सन 2018-19 चा गळीत हंगाम उत्कृष्टरित्या व यशस्वीपणे पार पडला असून या 35 व्या गळीत हंगामात कोणत्याही प्रकारचे मेजर मशिनरी प्रॉब्लेम उदभवलेले नाहीत. कारखाना सुरळीतपणे चालला. भागातील ऊसाची उपलब्धता होण्यासाठी सभासद, बिगर सभासद, संचालक मंडळ, कार्यकर्ते व कर्मचारी बंधूंचे ङ्गार मोठे योगदान आहे. या गळीत हंगामात 163 दिवसांत एकूण 6,36,340 मे.टन ऊसाचे गाळप करून सरासरी 12.33% या साखर उतार्‍याने 7,85,400 क्विंटल साखर उत्पादन केली. यामध्ये 1,62,300 क्विंटल रॉ शुगरचा समावेश आहे. सदर हंगामात सरासरी 156.68% क्षमतेचा वापर होऊन प्रतिदिन 4008.44 मे.टन सरासरीने ऊस गाळप केले. सरासरी हेक्टरी टनेजसुध्दा 80.00 मे.टन निघालेले आहे. 

2018-19 चे गाळप हंगामात शासन निर्धारीत सूत्रानुसार कारखान्याची एङ्ग.आर.पी. प्रति मे.टन रूपये 2815/- असून या हंगामात सुरूवातीपासून गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून प्रति मे.टन 2300/- ऊसाचे पेमेंट (विनाकपात) केलेले आहे व उर्वरित प्रति मे.टन रूपये 515/- देय असून या पेमेंटची लवकरच व्यवस्था करण्यात येत असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. 

या हंगामात कारखान्याकडील डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प यशस्वीपणे चालला असून को.जनरेशनकडे 5 कोटी 88 लक्ष 30 हजार युनिटस घथक विजेचे उत्पादन करून यामधून 1 कोटी 52 लक्ष 57 हजार वीज युनिटस घथक अंतर्गत वापर करून 3 कोटी 72 लक्ष 6 हजार युनिटस घथक वीज वितरण कंपनीस निर्यार्त करण्यात आली आहे. को.जनरेशन क्षमता वापर 87.85% इतका झालेला आहे.