Breaking News

राजमाता जिजाऊ महिला मंडळाने उभारली सामूहिक गुढी


संगमनेर/प्रतिनिधी
भारतीय संस्कृती विविध भाषा, परंपरा, सण, संस्कृती यांनी नटलेली आहे. विविधता हे वैशिष्ट असणार्‍या या संस्कृतीत सामूहिक सण साजरे केल्याने सर्व धर्म समभाव वाढीस लागून आनंद द्विगूणीत होतो. याच आदर्शप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या कांचन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ महिला मंडळाने सुदर्शन निवासस्थानी सामूहिक गुढी उभारुन सण साजरा केला. सुदर्शन निवासस्थानी राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्यावतीने सामूहिक गुढी उभारण्यात आली. यावेळी समवेत सुलभा दिघे, ललिता दिघे, शारदा सातपुते, सिमा काकड, शैला आवारी, शितल सातपुते, उवला नेहे, मिनाक्षी थोरात, पुष्पताई सुर्वे, आशा वामन, प्रियंका डेंगळे, डॉ.जया घोलप, भारती डेंगळे, माधुरी खर्डे व आदी महिला भगीनींनी सामूहिक गुढी उभारुन आनंद व्यक्त केला.