Breaking News

'पारनेर-नाशिक' साधी बस सुरु करण्याची मागणी


राहुरी/प्रतिनिधी

राहुरी कारखाना या ठिकाणी सायंकाळी नाशिककडे जाणारी पारनेर-नाशिक हिरकणी बस थांबते. यामध्ये  नोकरदार व पासधारक विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते.  परंतु या बसमधून येणार्यांना पास सुविधांचा फायदामिळत नाही. या करिता 'पारनेर-नाशिक' साधी बस सुरु करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.   सध्या येणारी हिरकणी बस   पारनेर डेपो येथून सुटून नाशिकला जाताना ५ ते ५.३० दरम्यान राहुरी कारखाना येथे येते.  

मात्र या बसचा फायदा दररोज ये-जा करणारे पासधारक नोकरदार व विद्यार्थी यांना होत नाही. तसेच हि बस गेल्यानंतर ७ वाजतापुन्हा पारनेर – नाशिक हि हिरकणी बस सोडली जाते.  दोन तासाच्या अंतरादरम्यान हिरकणी बस सोडून सर्वसामान्य नागरिक, नोकरदार व विद्यार्थी यांना वेठीस धरले जात आहे. पारनेर आगाराने  पासधारक नोकरदार व विद्यार्थी यांचा विचार करून नाशिक येथे जाणारी साधी बस  सायंकाळी ५ ते ५.३० वेळेत राहुरी कारखाना येथे पोहचेल अशा पद्धतीने सुरु करावी  अशी मागणी नागरिक करत आहेत.