Breaking News

श्रीरामपूर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा; पाण्यासाठी उपाययोजना केल्यानंतर मतदानाचा विचार ;ग्रामसभेतील ठराव


श्रीरामपूर/प्रतिनिधी
 भंडारदरा धरणाच्या अखेरच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिलेश्रीरामपूरराहाता  राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चाकाढत अधिकाऱ्यांना घेराव घातलापाणीप्रश्नी उपाय योजना  झाल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय श्रीरामपूर येथील उंबरगावमाळेवाडीवळदगावसह काही गावांनी ग्रामसभा घेऊन करण्यात आला.

धरणातून १५ मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होतेअखेरच्या आवर्तनातून उसासह चारा पिकांना जीवनदान मिळणार होतेमात्रश्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडीउंदिरगावहरेगावमुठेवाडगावमाळवाडगाववडाळा महादेवउंबरगावसह राहुरी तालुक्यातील काही गावांना पाणी मिळू शकले नाहीराहाता तालुक्यातील लोणीसह सोनवगाव परिसरही पाण्यापासून वंचित राहिलात्यामुळे गुरुवारी पाटबंधारेविरोधात शेतकऱ्यांनी तीव्रआंदोलन केले.

श्रीरामपूरमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी  पाटबंधारेच्या वडाळा उपविभागीय कार्यालयाला घेराव घातलायानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या दिलाजमावबंदी आदेश लागू झालेलेअसल्याने यावेळी पोलिसांची  कूमक बोलविण्यात आलीकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणेसभापती सचिन गुजरशेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसलेअनिल औताडेराजेंद्र पाऊलबुद्धेविश्वनाथ मुठेदिलीप गलांडेनानासाहेब पवारसुनील कुदळेरघुनाथ उघडेसोपान औताडेआमदार भाऊसाहेब कांबळे आदींसह शेतकरी यावेळी सहभागी होते
आता भंडारदरा धरणात एक हजार ६००  निळवंडेत  हजार १७३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहेत्यातील ४५० एमसीएफटी हा मृतसाठा आहे हजार ३०० दशलक्ष घनफूट पाण्यामध्ये जुलैपर्यंतचे पिण्याचे नियोजनकरण्यात आले आहेलाभक्षेत्रातील नगरपालिका  ग्रामपंचायतींच्या साठवण तलावाकरिता पाणी शिल्लक ठेवण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश आहेतप्रत्येकी ७०० एमसीएफटीच्या आवर्तनातून हे तलाव भरले जातीलअशीमाहिती देशमुख यांनी दिली.
आज सायंकाळी माळेवाडीउंबरगावउंदिरगावमुठेवाडगाव येथे ग्रामसभा घेतल्या जाणार आहेतत्यात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय होणार आहेनेते मंडळी  उमेदवारांना गावात येण्यास मज्जाव केलाजाणार आहेअशी माहिती सरपंच सोपान औताडेजितेंद्र भोसलेअनिल औताडेविश्वनाथ मुठेराजेंद्र पाऊलबुद्धे आदी नेत्यांनी दिली.