Breaking News

बिबट्याची पिल्ले आढळल्याने घबराट पट्टा

Image result for बिबट्याची पिल्ले

संगमनेर/प्रतिनिधी

निळवंडे येथे एका शेतामध्ये बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. निवृत्ती नामदेव पवार यांच्या शेतामधील गिन्नी गवतात हे पिल्लेआढळून आले.निळवंडे शिवारात मोठ्या प्रमाणात डाळिंब बागा आहेत. या भागात पाणी व भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्यांचा संचार सुरु झाला आहे.

संगमनेर विभागाचे उपविभागीय वनअधिकारी मच्छिंद्र गायकर, संगमनेर भाग दोनचे वनक्षेत्रपाल बी.एल.गीते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शिवाजी डांगे, वनरक्षक संतोष पारधी,वनकामगार संपत ढेरंगे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सदर ठिकाणी त्यांनाही बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. मात्र आई व पिल्लांची ताटातूट केल्यास मादी बिबट्याहिंसक बनायला नको, या उद्देशाने त्यांनी पिल्ले त्याठिकाणीच ठेवली आहेत.

रविवारी सकाळी पुन्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता पिल्ले आढळून आली नाहीत. मादी बिबट्याने रात्रीच पिल्ले दुसरीकडे हलविली होती. निळवंडे परिसरातमादी बिबट्याने काही हिंसक उपद्रव केल्यास त्यास पकडण्यासाठी पिंजरा लावला जाईल, असे वनपाल शिवाजी डांगे यांनी सांगितले.