Breaking News

कोयना नदीत बुडून एकाचा मृत्यू


कोयनानगर / प्रतिनिधी : कोयना नदीत पोहताना पाटण तालुक्यातील मारुल हवेली गावातील रोहित जाधव या युवकाचा बुडुन मृत्यू झाला आहे. 

येराड, ता. पाटण येथे रविवार दुपारी दीड वाजता रोहित जाधव वय 18 हा युवक कोयना नदीत मित्रासोबत पोहोयला गेला असता कोयना धरणातून अतिरिक्त पाणी सोडले असल्याने पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने प्रवाहात वाहत जात बुडुन मृत्यू झाला. मुळगाव मारूल हवेली ता.पाटण येथील रोहीत जाधव लहानपासुन येराडला आजोळी मामाकडे राहत होता. नुकतीच त्याने बारावीची परिक्षा दिली आहे, या घटनेची नोंद पाटण पोलीस स्टेशनला झाली असुन कैलास गोतपागर (बीट हवालदार) अधिक तपास करत आहेत.
दरम्यान रोहीतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रूग्णालयात पाटण येथे करून मृतदेह मुळ गावी मारूल ता पाटण येथे अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.