Breaking News

एकाच कुटुंबातील पाच जणांचा मेहकरजवळ अपघाती मृत्यू


बुलडाणा / प्रतिनिधीः बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉर्पिओ कारची धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.