Breaking News

शिक्षण क्षेत्रातील बदलांवर आधारित शालेय शिक्षणाचा नवा कायदा


कोळकी / प्रतिनिधी : शालेय शिक्षणाचा नवा कायदा येऊ घातला आहे. शाळांसाठी अस्तित्वात असणार्‍या खासगी शाळा अधिनियम (एमईपीएस) ऍक्ट 1977; शाळा संहिता 1968; आणि महाराष्ट्र परिसंस्था हस्तांतरण कायदा 1971 हे कायदे सध्या अस्तित्वात आहेत. शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा अभ्यास करून या सर्व कायद्यांचा आढावा घेऊन नवा कायदा तयार करण्यात येणार आहे. आवश्यक असलेल्या बदलांची दखल घेऊन नवा कायदा तयार केला जाईल, असे शिक्षण आयुक्त यांनी सांगितले आहे. 

 गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदाही लागू झाला आहे. या पार्श्र्वभूमीवर शिक्षण विभागाने कायद्यात बदल करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली आहेत. नवा कायदा करताना जुना कायदा आणि शिक्षण क्षेत्रात झालेले बदल त्यांचा तुलनात्मक अभ्यास करून विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन तसेच प्रवेश प्रक्रिया, शुल्क रचना, कर्मचारी शिक्षक यांचे प्रश्र्न, न्यायालयाने दिलेले निकाल ,तज्ञांची मते विचारात घेऊन नव्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात येणार आहे. याचा मसुदा समाजातील विविध घटकांसाठी खुला करून त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर कायदा तयार करून त्याचे विधेयक मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची नुकतीच एक बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान तक्रारदार श्री. पवार यांना एका सावकाराकडून मारहान झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पवार यांनी थेट जिल्हा पोेलीस प्रमुखाकडे धाव घेतल्याचे समजते. पवार यांच्याप्रमाणेच शहर परिसरातील अनेकांना खासगी सावकार खुलेआम गंडा घालत असल्याचे प्रकार चर्चीले जात आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर अवैद्य व्यवसायिकांना चांगला चाप लागण्याची शक्यता आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वडनेरे यांनीही गांभीर्याने लक्ष घातल्याची चर्चा आहे.