Breaking News

श्रीगोंद्यातील १४ छावण्यांवर दंडात्मक कारवाई;नियमांनुसार तरतुदी न केल्याने कारवाई


श्रीगोंदे /प्रतिनिधी
 श्रीगोंदे तालुक्यातील १४ छावण्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहेजिल्हाधिकारी कार्यालयातील भरारी पथक  श्रीगोंद्याचे तहसिलदार यांनी वेगवेगळ्या केलेल्या पाहणीत हि कारवाई करण्यात आली.   नगरयेथील जिल्हाधिकारी कार्यालयातील भरारी पथकाने श्रीगोंदे तालुक्यातील जनावरांच्या छावण्यांची तपासणी केली़यामध्ये दहा छावणी चालक संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असूनगुरुवारी श्रीगोंद्याचेतहसिलदार महेंद्र महाजन यांनीही मांडवगण परिसरातील छावण्यांची तपासणी करुन चार संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल पाठविला आहे़.

श्रीगोंदा तालुक्यात ४७ जनावरांच्या छावण्यांमध्ये सुमारे २७ हजार लहानमोठी जनावरे आहेत़ यावर शासनाचे दररोज १७ लाख रुपये खर्च होत आहेत़अशा परिस्थितीत नियम मोडणाऱ्या छावणी चालकांवर प्रशासनानेदंडात्मक कारवाई करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे़त्यामुळे छावणी चालकांची धावपळ सुरू झाली आहे़.
छावणीवर अग्नीशामक दलाची सुविधा नाही़विजेचे अधिकृत मीटर नाही़लहानमोठी जनावरांची नोंदणी नसणेतसेच त्यांना बिल्ले नसणेअशा विविध कारणांमुळे छावणी चालकांवर कारवाई करण्यात आली असूनअसुविधांनुसार  ते  हजार रुपये दंड आकारुन सुधारणा करण्याच्या लेखी सुचना छावणी चालकांना दिल्या आहेत़.

स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान (श्रीगोंदा), तांदळेश्वर मजूर संस्था (महांडुळवाडी), जय जवान शेळीपालन संस्था (बांगर्डे), जगदंबा ग्रामीण पतसंस्था (रुईखेल), गंगामाता मजूर संस्था (घोगरगाव), भैरवनाथ प्रतिष्ठान (वडघुल),पिसोरे खांड विविध कार्यकारी सेवा सोसायटीभैरवनाथ युवा मंच (सारोळा सोमवंशी), जगदंब प्रतिष्ठान (घोगरगाव), नवनाथ वाचनालय (कामठीया छावणी चालक संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़.
तर तहसिलदार महेंद्र महाजन यांनी बाळराजे (थिटे सांगवी), विश्वनाथ मजूर (पिसोरेखांड), ओम चैतन्य (मांडवगणया संस्थावर दंडात्मक कारवाई करण्याचा अहवाल तयार केला आहे