Breaking News

भिमशक्ती व एकता समितीच्यावतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन


टिळकनगर/प्रतनिधी : श्रीरामपुर तालुक्यातील दत्तनगरमध्ये भिमशक्ती संघटना व एकता समितीच्या आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम नगराध्यशा अनुराधा आदिक यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षांनी डॉ. आंबेडकर यांच्या विषयी प्रेरक माहिती सांगितली. डॉ. आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली असून, शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला. 

डॉ.आंबेडकरांनी गरीबीतून शिक्षण घेतले असून, त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले शिक्षण घेता येत आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांना खूप शिकवावे जेणेकरून ते आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, नगरसेविका शितल गवारे, पी.एस. निकम, शिक्षक सुनील जगताप, रवी गायकवाड, संजय जगताप, डॉ.विवेक बागले यांची भाषणे झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब शिंदे, विलास ठोंबरे, राजेंद्र मगर, संजय बोरगे, अशोक लोंढे, बबन माघाडे, सुनील संसारे, किशोर पटेल, अर्जुन अधिक, रामदास रेने, आनंद पठारे, सागर पाईक, राजू रंधे, राजू गायकवाड उपस्थित होते.