Breaking News

जयाप्रदा यांच्याबाबत आझमखान यांचे अश्‍लील वक्तव्य


रामपूर : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील प्रचारसभेत भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अश्‍लील शब्दात टीका केली. त्यामुळे आझम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर जयाप्रदा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आझम खान यांचे वक्तव्य माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. 2009 साली मी समाजवादी पार्टीची उमेदवार होती. त्यावेळीदेखील त्यांनी माझ्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. परंतु, त्यावेळी मला कुणी पाठिंबा दिला नव्हता. मी एक महिला आहे. आजम खान जे बोलू शकतात, ते मी बोलू शकत नाही. मी त्यांचे काय वाईट केले आहे ते मला माहित नाही. परंतु, ते वारंवार माझ्यावर अशा शब्दांमध्ये टीका करत असतात’, असे जया प्रदा म्हणाल्या आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर कोणा नेत्यांची जीभ घसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. समाजवादी पक्षाचे महासचिव आजम खान यांनी काल झालेल्या एका जाहीर सभेत भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर अश्‍लील टीका केली होती. त्यानंतर त्यांना भाजपने घेरले आहे. याप्रकरणी आजम खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने समाजवादी नेते आजम खान यांना नोटीस बजावली आहे. 
 
रविवारी रामपूर येथे झालेल्या जाहिरसभेत आजम खान यांनी भाजप उमेदवार जयाप्रदा यांच्यावर निशाणा साधत अश्‍लील वक्तव्य केले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर शाहबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यावेळी हे वक्तव्य केले, त्यावेळी व्यासपीठावर अखिलेश यादव हे देखील उपस्थित होते. याप्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील आजम खान यांचा खरपूस समाचार घेत मुलायम सिंह यादव यांना विचारणा केली आहे. स्वराज म्हणाल्या, ‘मुलायम भाई तुम्ही समाजवादी पक्षाचे पितामह आहात, तुमच्या समोर रामपूरमध्ये द्रोपदीचे वस्त्रहरण होत आहे. तुम्ही भीष्मासारखे मौन बाळगण्याची चुक करू नका’, असा सल्लादेखील दिला आहे. असे ट्विट करत स्वराज यांनी अखिलेश यादव, जया बच्चन आणि डिंपल यादव यांना टॅग केले आहे

मी मेल्यावर तुम्हाला समाधान मिळणार का? जयाप्रदा 

आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. तुम्हाला आठवत असेल तर 2009 साली मी समाजवादी पक्षाची उमेदवार होते. तेव्हाही त्यांनी माझ्या विरोधात वक्तव्य केले होते. तेव्हा कोणीही मला पाठिंबा दिला नव्हता. मी एक महिला आहे. आझम खान जे बोलले ते मी पुन्हा बोलू शकत नाही. मी त्यांचे काय बिघडवले आहे, ते मला समजत नाही. ज्यामुळे ते सतत माझ्याबद्दल अशा पद्धतीने बोलत असतात,’ असे जया प्रदा म्हणाल्या.

’आझम खान यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये. कारण हा माणूस निवडणूक जिंकला तर लोकशाहीचे काय होईल? समाजामध्ये महिलांना स्थान उरणार नाही. आम्ही कोठे जायचे? मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का? तुम्हाला काय वाटते, मी घाबरुन रामपूर सोडून निघून जाईन? मी रामपूर सोडणार नाही,’ असे जया प्रदा यांनी ठणकावून सांगितले.

दोषी सापडलो, तर उमेदवारी मागे घेईन : आझम खान

आझम खान यांनी आपण अभिनेत्री आणि भाजप अभिनेत्री जया प्रदा यांच्याविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही, असे सोमवारी म्हटले आहे. जया प्रदा या खान यांच्याविरोधात रामपूर येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. खान यांनी येथे झालेल्या निवडणूक समाजवादी पक्षाच्या प्रचार सभेत जया प्रदा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्याकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान खान यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.