Breaking News

झेंटो सिस्टिम्स मध्ये संजीवनीच्या पाच विद्यार्थ्यांची निवड


कोपरगाव/प्रतिनिधी
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत झेंटो सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड या प्रापर्टी मॅनेजमेंट साॅफ्टवेअर क्षेत्रातीलआघाडीच्या कंपनीमध्ये  पाच विद्यार्थ्यांची निवड झालीअशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.

 संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्षसहकार महर्षी शंकरराव  कोल्हेकार्याध्यक्ष नितीन  कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यातसेचमॅनेजिंग ट्रस्टी  अमित केाल्हे यांनी निवड झालेल्या अनिता संजय कदमशुभम नामदेव दारूंटेअपुर्वा शिवाजी जाधवएकनाथ किरण पाटीलपुणम भाऊसाहेब चव्हाणगायत्री रविंद्र ठोसर  शुभम अशोक  ढोकचैळे यांचासत्कार केलायावेळी प्राचार्य डाॅडीएनक्यातनवारडाॅअभिशेक भागवतडाॅबीपवार  प्राबारबींडप्रामुकुंद भोर  संजय गवळी आदी उपस्थित होते.