Breaking News

कॅथॉलिक शाळेत समता पंधरवाडा पट्टा


टिळकनगर/वार्ताहर

राहता तालुक्यातील टिळकनगर येथील कॅथॉलिक मराठी शाळेत 11 एप्रिल महात्मा फुले जयंती व 14 एप्रिल डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त समता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शाळेतील शिक्षक महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातून विविध पैलूवर माहिती देणार आहे. यासाठी सर्व शिक्षकांना पुस्तके वाटप करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून सुरु झालेलाहा कार्यक्रम 15 एप्रिल पर्यंत चालू राहणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी एकच ध्यास करू अभ्यास, डॉ. आंबेडकरांना अभिवादन, एक वही एक पेन इत्यादी उपक्रमाबरोबच वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषणावाक्य स्पर्धेसह विवीध स्पर्धा आयोजितकरण्यात आल्या आहे. 14 एप्रिल हा दिवस शिक्षण दिन म्हणून पाळण्यात येणार आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, डॉ. आंबेडकर जयंती समिती,डॉ. आंबेडकर स्मारक समिती परिश्रम घेत असल्याची माहिती मुख्याध्यापक पी. एस. निकम यांनी द