Breaking News

कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत येळगावकरांनी विचार मांडावेत : गुदगे

Image result for कृष्णा-भीमा nadi

मायणी / प्रतिनिधी : फलटण येथे 10 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जाहीर सभेत कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला निधी देणार असे विधान केले. त्या स्टेजवर माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर होते. भीमा कृष्णा स्थिरीकरण योजनेबाबत आपले विचार डॉ. दिलीप येळगावकर यांनी स्पष्ट करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी मायणी येथे पत्रकार परिषदेत केला.

गुदगे पुढे म्हणाले, बुधवारी 10 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे जाहीर सभेत कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला भरीव निधी देण्याचे व योजना पूर्ण करणार असल्याचे आश्र्वासन दिले. यावेळी त्या स्टेजवर माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर उपस्थित होते. या योजनेस सुरुवातीपासून माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी विरोध केला होता. त्यांनी योजनेचे कामाच्या ठिकाणी आंदोलन करून या योजनेचे काम बंद पाडले होते.

डॉ. येळगावकर यांनी 2009 च्या इलेक्शनमध्ये संपूर्ण खटाव तालुक्यांमध्ये चित्ररथाद्वारे कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा नकाशा छापून खटाव-माण तालुक्यात फिरवला होता. यावेळी जमिनीखालून जाणार्‍या बोगद्यामुळे खटाव-माण तालुक्यातील विहीरी, बोरवेलचे पाणी बोगद्यात जाणार आणि खटाव माणचे वाळवंट होणार. माझा प्राण गेला तरी मी ही योजना पूर्ण होऊ देणार नाही, असा प्रचार करून जनतेकडून मते मागितली होती. आता मात्र अशी वेळ आली आहे की, त्यांच्या उपस्थित मुख्यमंत्र्यांनी योजनेसाठी भरीव निधी द्यायचे व योजना पूर्ण करण्याचे आश्र्वासन दिले आहे.

आता डॉक्टर गप्प बसले आहेत. याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे येळगावकारांनी या विषयाबाबत आपले विचार स्पष्ट करावेत, असे सुरेंद्र गुदगे यांनी याप्रसंगी सांगितले.