Breaking News

टँकरच्या मागणीसाठी कुळधरणला महिलांचे आंदोलन


कर्जत/प्रतिनिधी
 कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे टँकरच्या मागणीसाठी कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा  ग्रामपंचायत सदस्या वर्षाराणी सुपेकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयातठिय्या आंदोलन केले.चिंचेचे लवन भागात पाण्याची भीषण टंचाई असताना सरपंच  ग्रामविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने निवेदनाद्वारे  आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.त्यानुसार महिलांनी शुक्रवारीदुपारी १२ वाजता ग्रामपंचायतीत येवून ठिय्या दिला.

 कार्यालयात उपस्थित असलेल्या ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत तापकीर यांना संतप्त महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

वर्षाराणी सुपेकर यांनी चिंचेचे लवण भागात टॅंकरद्वारे नियमित पुरवठा होत नसल्याने महिलांना वणवण भटकावे लागत आहे.सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे उपलब्ध झालेल्या टँकरच्या पाणीपुरवठ्यात दुजाभावकरत असल्याचा आरोप त्यांनी केला.यापुढे पाणी वाटपात दुजाभाव  दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.

 भगवान सुपेकर यांनी शेततळ्यांमध्ये पाणी  सोडता टाक्यांमध्ये पाणी भरून देण्याची जोरदार मागणी केलीबंडू सुपेकर यांनी नळ पाणीपुरवठ्याचे पाणी उपलब्ध का होत नाही ? याचा जाब विचारला.त्यावेळी ग्रामविकासअधिकारी तापकीर यांनी ठेकेदाराकडून काम पूर्ण  झाल्याने पाणी पुरविण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.

 आंदोलनात निर्मला सुपेकरसावित्री सुपेकरसंगिता राठोडअनिता गवईपुष्पा सुपेकरमंदाकिनी जगताप,कल्पना सुपेकर , जाईबाई पवार आदी महिला तसेच ग्रामविकास संघटनेचे मुख्य संघटक कुमार जगतापबंडूसुपेकर,बंटीराजे जगताप आदींनी सहभाग घेतला होता.

 ग्राम विकास अधिकारी यांनी भागात टॅंकरद्वारे तसेच २० एप्रिल पासून नळपाणीपुरवठ्याद्वारे  नियमित  पाणीपुरवठा देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने अखेर आंदोलन स्थगित करण्यात आले.