Breaking News

पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला


नवी दिल्ली : पाकिस्तानची अर्थव्यवस्था शेवटची घटका मोजतेय की काय? अशी अवस्था पाकची झाली आहे. कर्जात आकंठ बुडालेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे तब्बल आठ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या कर्जांची मागणी केली आहे. मात्र ही मदत तात्काळ मिळू शकत नसल्यामुळे पाकला चांगलाच धक्का बसला आहे. 
 
पाकिस्तानमध्ये चीनने मोठमोठे उद्योग सुरू केले आहेत. अर्थात हे संपूर्ण उद्योगांसाठी चीनने पाकला कर्ज दिले आहे. जर आंतरराष्ट्रीय नाणे निधीने पाकला कर्ज दिले, तर पाक चीनचे कर्ज चुकवू शकते, त्यामुळेच अमेरिकेला या व्यवहारांत पारदर्शकता हवी आहे. पाकिस्तानाला मिळणार्‍या मदतीतून त्यांनी चीनचे कर्ज चुकवू नये, अशी लिखित गॅरेंटी त्यांना पाकिस्तानाकडून हवी. पाकिस्तानाला मिळणार्‍या मदतीतून त्यांनी चीनने कर्ज चुकवू नये, अशी लिखित गॅरेंटी त्यांना पाकिस्तानाकडून हवी.

2019-20 साठी चीनच्या मदतीने पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रांनी त्यांना 9.1 बिलियन अमेरिकन डॉलर्सची मदत केली. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून 8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मागणी करतो. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा एक गट एप्रिलमध्ये पाकिस्तानात येईल. तेव्हा मदत पॅकेजवर सह्या होतील. पण आता तो गट पाकिस्तानात मे मध्ये येण्याची शक्यता आहे. डॉन वर्तमानपत्राच्या सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही बाजूंनी अंतिम अटींवर चर्चा सुरू आहे. म्हणून हा उशीर होत आहे. डॉन वर्तमानपत्राच्या सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही बाजूंनी अंतिम अटींवर चर्चा सुरू आहे. म्हणून हा उशीर होतोय. डॉन वर्तमानपत्राच्या सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही बाजूंनी अंतिम अटींवर चर्चा सुरू आहे. म्हणून हा उशीर होतोय.