Breaking News

वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा


वर्ल्डकप 2019 साठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज संघाच्या 15 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. 30 मे पासून इंग्लड आणि वेल्स येथे वर्ल्डकप खेळला जाणार आहे. त्यासाठी विराट कोहली कडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीकडून विश्‍वचषकासाठी भारताचा संघ निवडण्यात आला आहे. या संघात दिनेश कार्तिक, विजय शंकर यांना संधी देण्यात आली आहे तर पंतला स्थान मिळाले नाहीय. आयसीसी विश्‍वचषक स्पर्धा 30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू होणार आहे. विश्‍वचषकाची सुरुवात 30 मे ला यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना 14 जुलैला लॉडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.

दरम्यान, या पंधरा सदस्यीय संघात यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, विजय शंकर, हार्दिक पांड्या, एम. एस. धोनी, केदार जाधव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल यांचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत संघातील इतर चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यात लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे. यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत याची चर्चा होती, पण त्याच्या जागी दिनेश कार्तिक यालाच निवड समितीची पसंती मिळाली आहे. तसेच हार्दिक पांड्या याच्या समवेत आणखी एक वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकर याला रायडूपेक्षा प्राधान्य देण्यात आले. याशिवाय, लोकेश राहुल हा आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसा प्रभावी दिसला नाही. मात्र गेल्या काही काळात देशांतर्गत स्पर्धामध्ये आणि खझङ मध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

भारतीय संघ
विराट कोहली - कर्णधार
रोहित शर्मा - उप कर्णधार
शिखर धवन
के. एल. राहुल
विजय शंकर
हार्दिक पांड्या
एम एस धोनी
केदार जाधव
भुवनेश्‍वर कुमार
जसप्रीत बुमराह
रविंद्र जडेजा
दिनेश कार्तिक
कुलदीप यादव
यजुवेंद्र चहल
मोहम्मद शमी