Breaking News

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण


संगमनेर / प्रतिनिधी: समतेचा हक्क देणार्‍या घटनेने प्रत्येक नागरिकांस स्वातंत्र्य दिले आहे.यामुळे लोकशाही व्यवस्था सुदृढ झाली असून झोपडीतील शेतमजूर ते श्रीमंत हे सर्व घटनेपुढे समान आहे. ही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे परिपूर्ण विद्वकता असलेले राष्ट्रपुरुष त्यांनी दिलेली लोकशाही व राज्यघटना ही सर्वांनी जपलीच पाहिजे असे प्रतिपादन मा.महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 128 व्या जयंती निमित्त अभिवादन सभा व समाज प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्यााप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,अ‍ॅड.संघराज रुपवते,बी.आर.कदम,सुधाकर रोहम,हिरालाल पगडाल, के.एस.गायकवाड,कॉ.कारभारी उगले, विनोद गायकवाड, अ‍ॅड.अमित सोनवणे,शशिकांत माघाडे,दिलीप भोरुंडे,प्रविण रुपवते,श्रीरंग तलवारे,अरुण गायकवाड,वेणूनाथ ठोंबरे,विलासराव दारोळे,अण्णासाहेब अडांगळे,रामनाथ जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सखाराम दारोळे वस्ताद यांच्या पत्नी श्रीमती सोनाबाई दारोळे,विष्णूभाऊ वाघमारे यांना जिवन गौरव तर श्रीमती सुनंदा कारभारी उगले व आधार फाऊंडेशनचे सुकदेव इल्हे यांना समाज प्रेरणा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.