Breaking News

'मोक्का' लावलेले फरार आरोपी गजाआड


पाथर्डी/प्रतिनिधी

वाळूचा ठेका न मिळाल्याने वाहनचालकांवर प्राणघातक हल्ला करून फरार असलेल्या तिघा वाळूतस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोक्कांतर्गत कारवाई झालेले हे आरोपी गेल्या पाचवर्षांपासून फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुरण पिंपरी (ता़. पैठण) येथून त्यांना ताब्यात घेतले.

नय्यूम उर्फ नईमखान कासम पठाण, सुभान यासीन शेख, रईस महंमद हानिफ (सर्व रा़ कुरणपिंपरी) असे अटक केलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत़. या तिघांनी वाळूचा ठेका न मिळाल्यानेपिंगेवाडी (ता़ शेवगाव) येथे विठ्ठल सोपान मुंढे व त्यांच्या सहकाऱ्यांवर हत्यारांनी प्राणघातक हल्ला केला होता़ . मुंढे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखलहोऊन त्यांच्यावर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई झाली होती़. हे आरोपी पिंपरी कुरण परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कॉन्स्टेबल बबन मखरे, दत्ता हिंगडे, सुनील चव्हाण, रवींद्र कर्डिले, संदीप पवार, भागिनाथ पंचमुख, विनोद मासाळकर, सचिन अडबल यांच्या पथकानेआरोपींना अटक केली़