Breaking News

पाटण येथे बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी दोघांना अटकपाटण/ वार्ताहर : तालुक्यात बेकायदेशीर दारू विक्री करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली. संदीप दिनकर तिकुडवे व शामराव पांडुरंग पवार अशी त्यांची नावे असून त्यांचेकडील दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शिंदेवाडी (सोनवडे) येथे संदीप दिनकर तिकुडवे (वय 35) हा आपल्या घराच्या मागील बाजूस बेकायदेशीररित्या दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सदर ठिकाणी छापा टाकून संदीप तिकुडवे याला ताब्यात घेतले व त्याचेजवळील सुमारे 1664 रूपये किमतीच्या 32 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

संदीप तिकुडवे याला अटक केली असून अधिक तपास हवालदार कृष्णा जाधव हे करीत आहेत.
तसेच नाडे ( नवारस्ता ) येथील शामराव पांडुरंग पवार (वय 52) हा सागर बारच्या मागील बाजूस बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच पाटण पोलीसांनी तेथे जाऊन छापा टाकला. यामध्ये शामराव पवार यास ताब्यात घेऊन त्याचे जवळच्या 44 दारूच्या बाटल्या असा एकूण 7280 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शामराव पवार याला अटक करण्यात आली असून अधिक तपास ए. एस. आय. संतोष कोळी हे करीत आहेत. दरम्यान, निवडणूक काळात अशा प्रकारच्या घटना वारंवार उघडकीय येत असल्याने अवैध धंदे जिल्ह्यात जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.