Breaking News

कोयना दूध संघावर सिताफळ बासुंदी व मँगो लस्सीकराड, (प्रतिनिधी) -शेतकर्यांच्या नाशवंत मालाला बाजारपेठ उपलब्ध करून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे काम करणाजया कोयना दूध संघाने सिताफळ बासुंदी व मँगो लस्सीचे उत्पादन सुरू करून एक नवीन कडी जोडण्याचे काम केले आहे. बाजारपेठेची मागणी बघून संघाने उपपदार्थ निर्मितीत आघाडी घेतली आहे. यापुढे कोयना दूध संघाने बाजारपेठेतील यंत्रणा सक्षम करून आंतरराज्य स्तरावर बाजापेठेचे कार्यक्षेत्र वाढवावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील यांनी केले.

खोडशी, ता. कराड येथील कोयना दूध संघावर सिताफळ बासुंदी व मँगो लस्सीच्या विक्री शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खविसचे चेअरमन रंगराव थोरात, बाजार समितीचे सभापती मोहनराव माने, कोयना बँकेचे चेअरमन रोहीत पाटील, प्रा. धनाजी काटकर, संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे, माजी चेअरमन निवासराव निकम आदीची उपस्थिती होती.

स्वागत संपतराव इंगवले यांनी केले. आभार व्हा. चेअरमन बाबूराव धोकटे यांनी मानले. कार्यक्रमास संघाचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक अमोल गायकवाड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.