Breaking News

खा. राजू शेट्टी यांचा निषेध


वडूज / प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणूक प्रचार सभेत ब्राम्हण समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या कृतीमुळे खटाव-माण तालुक्यासह राज्यातील समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्यांचा अनेकांनी समाजमाध्यमांतून जाहीर निषेध केला आहे. त्यांच्यावर आचार्य संहिता भंगाची कारवाई करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मंदार जोशी यांनी केली आहे.

या प्रकारचे निवेदन त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे. त्या निवेदनात खा. शेट्टी, समाजाबद्दल द्वेषभावना पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.