Breaking News

सैनिकांच्या लग्नकार्यासाठी मंगल कार्यालयास सवलत


अहमदनगर/प्रतिनिधी : आजी-माजी सैनिकांच्या मुला, मुलींच्या लग्नकार्य व इतर समारंभासाठी पाईपलाईन रोड, श्रीराम चौक येथील गंगा लॉनला 25 टक्के सवलत देण्याचे कैलास शिरसाठ व डॉ.विलास शिरसाठ यांनी जाहीर केले. त्यांचा माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने तिरंगा ध्वज देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, निवृत्ती भाबड, जगन्नाथ जावळे, महादेव शिरसाठ, नारायण घुले, अरूण थिटे, विजय जगदाळे, महादेव गर्जे, बळवंत पालवे आदींसह माजी सैनिक उपस्थित होते.