Breaking News

देवगाव वि.वि.का.से.सोसायटीतर्फे अपघाती विमाभेंडे/प्रतिनिधी

नेवासे तालुक्यातील अग्रगण्य असणारी देवगाव वि.विविध कार्यकारी सेवा -सहकारी सोसायटी हि विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली कारभार करणारी व आपल्या सभासदांचे नेहमीच हितजपणारी सहकारी सोसायटी व सभासदांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता सभासदांना संरक्षण देणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. या संस्थेने १३०७ सभासदांचा मोफत अपघाती विमा

उतरवला आहे. सदरच्या संस्थेचे एकूण कर्जदार व बिगर कर्जदार १३०७ असून संस्थेला नेहमीच आँडीट वर्ग -अ मिळालेला आहे. संस्थेकडून ऊस पीककर्ज, गाई-म्हशी, शेती औजारे, घर बांधने,मुलीच्या विवाहकर्ज,शैक्षणिक कर्ज आशा विविध प्रकारच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती संस्थेचे सचिव बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

सदरची विमा पँलीसी मिळवून देण्यासाठी युनायटेड इंडिया इ कंपणीचे राहुरी शाखेचे शाखा प्रबंधक डी. एन. काटकर यांचे मार्गदर्शन लाभले. व कंपणीचे विद्यमान विमा एजंट पाडळे रमेश यांच्या एजन्सीमधूनपॉलिसी देण्यात आली.