Breaking News

आंबेडकर जयंतीनिमित्त फळांचे वाटप


श्रीगोंदे/प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर जिल्हा शाखेचे सचिव आयु सतिश ओहोळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदे येथील सर्व रुग्णांना फळे वाटप केली.

त्याच प्रमाणे सतत समाज्याच्या सरंक्षणा अहोरात्र सेवा करणे सर्व पोलिस कर्मचारी यांना फळे वाटप करून उत्तम आरोग्य लाभावे अशा सुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे डॉ. अनिल घोडके संचलीत सुर्या हॉस्टिल श्रीगोंदे येथे फळांचे वाटप करण्यात आले. संस्थेचा या उपक्रमात जेष्ठ नागरिक, रावसाहेब घोडके, नगरसेवक संग्राम घोडके, नगरसेविका सोनाली घोडके, सामाजिक कार्यकर्ते सुरज घोडके, विलास घोडके, चंपालाल घोडके, लक्ष्मण घोडके, आदींनी सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.