Breaking News

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन


कोपरगाव ता/प्रतिनिधी
कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक शिक्षण महर्षी मा.खा. कर्मवीर शंकरराव काळे यांची 98 वी जयंती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्यावतीने कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतमनगर, सुरेगाव येथे साजरी करण्यात आली.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे यांना अभिवादन करण्यासाठी कोसाका उद्योग समूह व सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी कर्मवीर शंकरराव काळे यांच्या प्रतिकूल परिस्थितीत अथक परिश्रमातून केलेल्या सहकार, शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी मा.आ.अशोक काळे, कर्मवीर शंकरराव काळे यांचे जावई अनिल शिंदे (अमेरिका), कन्या स्नेहलताई शिंदे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे व आदी उपस्थित होते.