Breaking News

देशमुखांच्या संस्थात्मक कामास पाठबळ देवू : चंद्रकांतदादावडूज / प्रतिनिधी : खटाव-माण या कायमस्वरुपी दुष्काळी प्रतिकुल परस्थितीवर मात करत युवा नेेते रणजितसिंह देशमुख यांनी सहकारी सुतगिरण्या व खासगी सखर कारखान्याच्या माध्यमातून चांगले संस्थात्मक काम उभे केले आहे. या त्यांच्याा प्रयत्नामुळे अनेकांच्या संससास प्रत्यक्ष हातभार लागत आहे. देशमुख यांचे हे काम आणखी वेगाने पुढे जावे याकरीता राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पाठबळ देवू अशी ग्वाही राज्याचे महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

निमसोड (ता. खटाव) येथे श्री. देशमुख मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, शेखर चरेगांवकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, अनिलभाऊ देसाई, जितेंद्र पवार, बाळासाहेब खाडे, गणेश रसाळ, वसंतराव गोसावी, रणधीर जाधव, भरत मुळे, अनिल भोसले, संदिप महाडीक, विजय साखरे, पृथ्वीराज गोडसे, आप्पासाहेब गोडसे, परेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री पाटील म्हणाले, विधायक काम करणार्‍या चांगल्या कार्यकत्यांमुळे जनमानसात पक्षाची प्रतिमा उजळली जाते. श्री. देशमुख यांच्या संस्थात्मक कामाबद्दल आपण बरेच दिवस ऐकून होतो. अनेकवेळा त्यांनी सुतगिरणी पाहण्यासाठी येण्याचा आग्रहही केला होता. निवांतवेळी त्यांच्या सुतगिरणीस आवर्जुन भेट दिली जाईल. युती शासनाच्या धोरणामुळेच दुष्काळी भागात रखडलेल्या पाणी योजनांची कामे गतीने सुरु झाली आहेत.
रणजित देशमुख यांनी भाषणात आपल्या संस्थात्मक कार्याची सविस्तर माहिती दिली. तसेच या भागातील कार्यकर्ते व सर्वसामान्य शेतकरी सुखी-समाधानी होण्यासाठी जिहे-कठापूर योजनेचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. रणजित मोहिते-पाटील व नाईक निंबाळकरांनी भाषणात युतीला पाठींबा देणार्‍या सर्व पदाधिकारी, कार्यकत्यांची कामे करण्याबरोबर प्रत्येकाचा सन्मान राखण्याचे अभिवचन यावेळी दिले. राजूभाई मुलाणी यांनी प्रास्ताविक केले. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमास डॉ. संतोष गोडसे, हणमंतराव भोसले, सत्यवान कांबळे, शिवाजीराव देशमुख, पिंठूशेठ मराठा, धनाजी निंबाळकर, विकास साबळे, अरविंद गायकवाड, संदिप इंगळे, धनाजी देशमुख, शरद बागल, प्रसाद बागल, अनिल देशमुख, कल्याण यादव, संतोष देशमुख, राजेंद्र शेडगे आदी उपस्थित होते