Breaking News

पक्षात घुसमट होत असल्याची राजेंद्र म्हस्केंची खंतश्रीगोंदे/प्रतिनिधी
शेती वाचली पाहिजे. शेतकरी सधन झाला पाहिजे, म्हणून मी राजकारणात प्रवेश केला. पण आजचे राजकारण सामन्यांचे राहिले नाही. प्रश्‍न सोडविण्यासाठी ज्या पक्षात गेलो तिथे घुसमट होत असल्याची खंत भाजपचे नेते आणि पंचायत समितीचे माजी सदस्य कुकडी पाट पाणी परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी तालुक्यातील चांडगाव येथे पक्ष विरहीत मित्र परिवार स्नेह भोजन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.

म्हस्के पुढे म्हणाले की, शेतीचा मालक आज चाकर म्हणून जात आहे. मी पाणी प्रश्‍नावर समविचारी लोकांना बरोबर घेऊन पातपाणी साठी लढा उभारला. आज पिके जळत असताना आवर्तन उशिरा सुटत आहे. राजकारणात मी भाजप वाढविण्यासाठी कष्ट घेतले. पण आज तेथे वेगळेच घडत आहे. माझ्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नव्हते. पण मला चांडगावाने सरपंच केले सेवा संस्था दिली. पंचायत समितीचे सदस्य केले. त्यांच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही. भविष्यात पाटपाणी, औद्योगिक वसाहत उभारणीसाठी आयुष्य वेचनार आहे. यावेळी म्हस्के यांनी आपला जीवनपट उलगडताना 3,4 वेळा जीवघेण्या हल्ल्यातून वाचलो. त्यामुळे मी बोनस आयुष्य जगत असून ते शेतकरी व सामान्य माणसासाठी देणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ व बाजार समितीचे माजी उपसभापती संजय जामदार, शिवसेनेचे तालुका प्रमुख भाऊसाहेब गोरे आदींनी म्हस्के यांच्या पाट पाणी बाबत केलेल्या कार्याचा गौरव केला.