Breaking News

प्रा.रमेश पावसे यांना पीएचडी प्रदानसंगमनेर/ प्रतिनिधी
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्राध्यापक रमेश सहादू पावसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रधान झाली आहे. डेव्हलपमेंट ऑफ सिमॉस एसिक टू कॉम्पेन्सेट नॉन आयडीयालीटीस ऑफ मेम्सबेस्ड गायरोस्कोप अ‍ॅण्ड सिस्मिक सेन्सर या विषयावर आपला प्रबंध सादर केला. या प्रबंधाकरिता त्यांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरीचे प्राध्यापक डॉ. नितीन फुटाणे यांचे मार्गदर्शन लाभले. भूकंप व कंपन क्षेत्रातील अतिसुक्ष्म सेन्सरमधील अडथळे दूर करण्याकरिता अधिक सुलभ प्रणालीची अनुकरण तपासून ते एफपीएए या बोर्डावर स्थापित केले आहे. संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि रिसर्च सेंटर नाशिक या संशोधन केंद्रातील विभागात त्यांनी संशोधन केले. संशोधन केंद्र संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड रीसर्च सेंटर नाशिक येथील प्राचार्य डॉ.एस.टी.गंधे, मातोश्री विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.के खराटे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष आर एस बोरमाने, डॉ.जे.जे चोपडे, डॉ.व्ही.जे.गोंड, डॉ.आर.एस.पाटील, डॉ.जी.एफ.फडे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. या यशाबद्दद्दल त्यांचे आ. बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त आ.डॉ.सुधीर तांबे, विश्‍वस्त शरयु देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व आदींनी अभिनंदन केले आहे.